Pune Railway Station News | पुणे व लगतच्या जिल्ह्यातील राजस्थानी नागरिकांसाठी खूषखबर ! पुणे ते पाली साप्ताहिक रेल्वे 30 मे पासून सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Railway Station News | पुण्यातील राजस्थानी नागरिकांची पुणे ते पाली (राजस्थान) या रेल्वेची (Pune Jn to Pali Marwar Trains) गेल्या अनेक वर्षांची मागणी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) पुर्ण केली आहे. येत्या ३० मे पासून प्रत्येक आठवड्यातील मंगळवार पासून संध्याकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पुणे स्टेशन येथून गाडी पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शनसाठी रवाना होणार असून मारवाड येथून बुधवारी पुण्याकडे जाण्यासाठी ही रेल्वे असेल, अशी माहीती पाली चे खासदार पी.पी. चौधरी (MP P. P. Chaudhary) यांनी दिली. (Pune Railway Station News)

पुणे जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यात पाली आणि जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यातील सात ते आठ लाख राजस्थानी नागरिक राहातात. सध्या पुणे जोधपूर ही आठवड्यातून एकच दिवस रेल्वे होती. त्यामुळे नागरिकांना मुंबई (Mumbai) अथवा अहमदाबाद (Ahmedabad) पर्यंत रेल्वेने प्रवास करायला लागायचा. तेथून पाली आणि जोधपूर असा प्रवास करायला लागायचा. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय व्हायची. यापार्श्‍वभूमीवर पाली आणि जोधपूर जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी दिवंगत माजी खासदार गिरीष बापट (Late MP Girish Bapat), खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), पालीचे खासदार पी.पी. चौधरी हे सातत्याने करत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही अनेक दिवसांची मागणी मान्य करत पुण्यातून दर मंगळवारी आणि पाली येथून दर बुधवारी पुणे ते पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. मंगळवार ३० मे रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार चौधरी यांनी दिली आहे. (Pune Railway Station News)

 

पुणे व आसपासच्या जिल्ह्यात राजस्थानातील पाली व जोधपूर परिसरातील लाखो नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने राहातात. तसेच जोधपूरला पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. सध्या पुणे ते जोधपूर ही एकमेव रेल्वे आठवड्यातून एकदा अपडाउन करते. त्यामुळे या गाडीचे बुकींग मिळणे कठीण होते. पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईतून अथवा अहमदाबाद पर्यंत प्रवास करून तेथून गाडी बदलून पाली, जोधपूर आणि लगतच्या तीन जिल्ह्यांचा प्रवास करायला लागायचा. त्यामुळे पुणे ते पाली अशी दररोज रेल्वे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राजस्थानी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती.

पाली चे खासदार पी.पी.चौधरी यांच्या माध्यमातून जानेवारी महिन्यांत रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेउन ही मागणी करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून यामुळे नागरिक आणि पर्यटकांची चांगली सोय झाली असून रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया पुणे सिरवी क्षत्रिय समाजाचे (Sirvi Kshatriya Samaj ) सचिव व भाजपच्या व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश चौधरी (Umesh Chowdhary) यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Pune Railway Station News | Good news for Rajasthani citizens of Pune and adjacent districts! Pune to Pali weekly train will start from May 30

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : लाच घेतल्यानंतर पळून जाताना महिला सरपंच आणि ग्रामसेवक
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’,
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024
मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग !
उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

MP Shrikant Shinde | ‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, खा. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान (व्हिडिओ)