Pune Railway Station News | पुणे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज लवकरच होणार कार्यरत; पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Railway Station News| पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवासांच्या सुरक्षितेच्या कारणावरून बंद असलेला फूट ओव्हर ब्रिज (FootOver Bridge) लवकरच पुन्हा चालू करण्यात येणार आहे. हा पूल बंद असल्यामुळे सध्या इतर प्लॅटफॉर्मवर (Platform) जाण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट (Audit) केले आहे. या ऑडिटदरम्यान प्रशासनाला काही त्रुटी आढळून आल्या असून त्या दुरुस्त झाल्यावर हा पूल पुन्हा वापरता येणार आहे. (Pune Railway Station News)

पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) अनेक दिवसांपासून मोठी गर्दी बघायला मिळत आहे आणि याचे कारण म्हणजे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचे रस्ते अपुरे पडत आहेत. फूट ओव्हर ब्रिज बंद असल्यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना (Senior And Disabled Citizens) इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी खुप कसरत करावी लागत आहे. इलेक्ट्रिक सरकत्या जिन्यांचा (Electric Stairs) वापर त्यांना करता येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) नुकतेच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्या वेळी या फूट ओव्हर ब्रिज ची काही दुरुस्ती करून तो वापरण्यात आणता येणार आहे, असे पाहणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वेने हा जुना पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Railway Station)

Web Title :- Pune Railway Station News | old footover bridge at pune railway station to open soon

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली