Pune Railway Station Platform Ticket | पुणे रेल्वे स्थानकावर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला, तर होईल वीसपट दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Railway Station Platform Ticket | पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) नातलगांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जर तुम्ही पुणे रेल्वे स्थानकावर जाणार असाल तर प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) काढायला विसरु नका. जर तुम्ही विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आला तर तुमच्याकडून शेवटच्या चेकिंग स्टेशनपासूनच्या (Checking Station) तिकिटाची रक्कम व अडीचशे रुपयाचा दंड (Penalty) वसूल केला जाईल. महिनाभरात विना तिकीट प्रवास (Without Ticket Travel) करणाऱ्या व प्लॅटफॉर्म तिकीट नसलेल्या जवळपास 25 हजार प्रवाशांकडून दीड कोटी रुपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

ही आहेत चेकिंग स्टेशन
पुणे रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वेसाठी पुणे रेल्वे प्रशासनाने मुंबई (Mumbai), दौंड (Daund), मनमाड (Manmad) व कल्याण (Kalyan) हे चेकिंग स्टेशन ठरवली आहेत. जर पुणे स्टेशनवर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला. तर कारवाईवेळी जी गाडी फलटावर आली अथवा आधीची पहिली गाडी लक्षात घेऊन त्याच्या चेकिंग स्टेशनचा आधार घेत कारवाई केली जाते. (Pune Railway Station Platform Ticket)

महिन्यात दीड कोटींचा दंड वसूल
जानेवारी महिन्यात पुणे रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवास करणारे व विना प्लॅटफॉर्म तिकीट जवळपास 25 हजार प्रवासी आढळून आले. या दंडात्मक कारवाईत एकूण 1 कोटी 42 लाख 59 हजार 222 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

दररोज 1 हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
पुणे रेल्वे स्थानकावर दररोज सरासरी 222 प्रवासी गाड्यांची ये – जा होत आहे. यातून लाखो प्रवासी ये – जा करत असतात. मात्र, त्या तुलनेत प्लॅटफॉर्म तिकीटाला खूप कमी प्रतिसाद लाभतो. आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपये करण्यात आले आहेत. तर दररोज जवळपास एक हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे.

 

Web Title :- Pune Railway Station Platform Ticket | dont have a platform ticket pay 20 times the fine indian railway

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा