Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्थानकाचा (Pune Railway Station) कायापालट करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पुणे स्थानकात (Pune Railway Station) प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचे पुणे रेल्वे स्थानकाच्या नव्या व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांनी सांगितले.

 

स्थानकातील सर्व फलाटांची लांबी वाढविणे, स्थानकात पादचारी पुलाला जोडण्यासाठी उद्वाहन (लिफ्ट) बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणेच्या जाळ्याचा विस्तार करणे आदी बदल करण्यात येणार आहेत. तसेच पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर टर्मिनसबाबतही योजनात्मक पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे दुबे यांनी सांगितले. इंदू राणी दुबे यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे विभागाशी संबंधित अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी अपर व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ अभियंता पी. के. चतुर्वेदी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी अधिकारी उपस्थित होते. (Pune Railway Station)

सध्या पुणे स्थानकातील फक्त दोन फलाटांवर 29 डब्यांच्या गाड्या उभ्या करता येतात.
त्यामुळे आगामी काळात सर्व फलाट मोठे करण्यात येणार आहेत.
स्थानकावरील पादचारी उड्डाणपुलासंबंधीदेखील मुद्दा विचाराधीन आहे.
पुलाला जोडण्यासाठी स्थानकात पाच उद्वाहनांना मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे त्यांचे काम लवकर सुरू करणार आहे. रॅम्प सुविधांवर विचार सुरू आहे.
स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा जुनी झाली असून, ती बदलण्यात येणार आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्यावाढ, पुण्याहून अयोध्येसाठी स्वतंत्र गाडीची सुविधा आदींबाबतही प्रयत्न करणार असल्याचेही दुबे यांनी नमूद केले.

 

पुणे-लोणावळासाठी चालणाऱ्या दुपारच्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहेत.
सध्या पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
त्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग प्रतितास 110 वरून 130 किलोमीटर करण्यात येईल.
या नियोजनातून उपनगरीय वाहतुकीतील फेऱ्यांची संख्या वाढू शकेल, असे यावेळी दुबे यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Railway Station | pune railway station get makeover soon pune lonavala local trips will be increased indurani dube

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल