पुणे रेल्वे स्थानक होणार प्लास्टिक मुक्त 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील रेल्वे स्थानकावर आता कचरा राहणार नाही, पुणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे स्थानकावरील प्रवाशांची वर्दळ,  त्यातून निर्माण होणारा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हे दिवसेंदिवस धोकादायक होताना दिसत हाेते. मात्र आता पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून स्थानकावर यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9b63710-a2ea-11e8-9ee5-33008423633d’]

पुणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अस्वच्छता दाखवून देण्याबाबत प्रवाशांना आवाहन सुद्धा केले होते,  स्थानकाच्या आवारात प्रवासी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मोठय़ा प्रमाणावर घेऊन येतात. त्याचा वापर करून झाला कि  त्या कोठेही फेकून दिल्या जातात. त्याचा  भुयारी गटार किंवा चेंबरमध्ये या बाटल्या अडकून राहिल्यास सांडपाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होतो. यामुळे पर्यावरण असंतुलित होते व हानी पोहचते.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2d3e55a-a2ea-11e8-904c-915fb99a1342′]

या यंत्राची सुरुवात महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते  कारणात अाली. प्लास्टिकच्या बाटल्यांचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी पुणे रेल्वेने पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र फलाट क्रमांक एकवर प्रतीक्षालयाजवळ बसविले आहे. या वेळी पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अपर व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णा पाटील त्या वेळी उपस्थित होते. जस्तीत जास्त यंत्र पुढील काळात बसवण्यात येणार असल्याचे माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.