Pune Rain | संततधार पावसामुळे पुण्यात मुठेला पूर ! खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग

पुणे : Pune Rain | खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के भरली असून गुरुवार रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. (Pune Rain)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते मध्य प्रदेशाकडे सरकल्याने मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे खडकवासला धरण, पानशेत, वरसगाव, टेमघर ही चारही धरणे भरली आहे. त्यामुळे वरील तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. ते सर्व पाणी खडकवासला धरणात वेगाने जमा होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विर्सग सकाळपासून वाढविण्यात येत आहे. (Pune Rain)

खडकवासला धरणातून सकाळी ६ वाजता ६ हजार ८४८ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत होते.
सकाळी ९ वाजता हा विसर्ग १५ हजार २११ क्युसेक करण्यात आला.
त्यानंतर १० वाजता १७ हजार ६७१ क्युसेक आणि त्यानंतर ११ वाजता १९ हजार २८९ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पूर येणार असून नदीकाठच्या वस्तींना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुळशी, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने तेथूनही मोठ्या प्रमाणावर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
उजनी धरणातून ३० हजार क्युसेक तर वीर धरणातून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने भीमा नदीलाही पूर आला आहे. नदीकाठच्या लोकांना इशारा देण्यात आला आहे.

Web Title :- Pune Rain | Due to continuous rain, Muthela floods in Pune! Highest discharge of this season from Khadakwasla dam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करून कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक; भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Irrigation Department On Khadakwasla Dam | खडवासला धरणात सांडपाणी न मिसळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वंकष आराखडा