उपनगरातील काही ठिकाणी पावसाची हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडाक्याचे उन आणि सायंकाळी पावसाळी वातावरण तयार होते. आज दुपारी चार वाजता उपनगर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

हडपसर आणि परिसरातही पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीन पासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. आकाशामध्ये ढग दाटून आले आणि पावसाच्या धारा कोसळल्या. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. यावेळी पक्ष्यांचा किलबिलाटही वाढला होता.

आज शुक्रवारी (दि. 1 मे) दुपारी तीनच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. पावसाने वारा घातला आणि वरुणराजा बरला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हवेत गारवाही सुरू झाला होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे, त्यामुळे नागरिक घरामध्येच थांबून आहेत. रस्त्यावरही शुकशुकाट दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम, तर अनेक कंपन्यांनी काम बंद ठेवले आहे. तसेच दुकाने आणि इतर व्यवहारही बंद आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने सामान्यजनांमध्ये भयावह वातावरण तयार झाले आहे.