पुणे शहरात झाडपडीच्या 15 घटना, सुदैवाने मोठी दुर्घटना नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेली अनेक दिवस उघडीक दिल्यानंतर काल पाऊस सुरू झाला. यामुळे पुणेकर आनंदी झाले. परंतु अचानक आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ उडवली. ठीकठिकाणी पाणी साचण्यासोबतच झाडपडीच्या 15 हुन अधिक घटना घडल्या आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

दोन दिवस पावसाच्या सरी कोसळत आहेत. यात हलका वारा सुटला असल्याने शहरात मोठमोठी झाडे उन्मळून पडत आहेत. आज सकाळी एरंङवणे येथील दामोदर अपार्टमेंट येथे मोठे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणी जखमी नाही. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच काही वेळात झाड बाजूला केले.

यासोबतच कालपासून अग्निशमन दलाकडे 15 झाडपडीच्या घटनाची नोंद झाली आहे. यामुळे त्या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र अग्निशमन दलाने वेळीच येऊन झाड बाजूला करत रस्ता मोकळा केला. शहरात दोन दिवसात कोथरुड, कोरेगाव पार्क, सहकारनगर, रास्ता पेठ, लष्कर, कर्वेनगर, एरंडवना, औंध, शिवाजीनगर, पाषाण, सुस रोड, ताथवडे उद्यान, येरडवना गावठाण, न.ता. वाडी, बालेवाडी, भवानी पेठ या भागात या घटना घडल्या आहेत