Pune Rain | पुणे महापालिकेकडून नदीकाठच्या ‘या’ परिसरांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Pune Rain) पडत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी तर नद्यांनी काठ सोडला आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खडकवासला (khadakwasla dam) धरणातून ७९० क्युसेक्सने विर्सग करण्यात आला. दरम्यान, शहरातही पावसाची संततधार सुरु (Rain) आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या काही भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे महापालिकेच्या (pune corporation) अधिकृत टविटर अकांऊटवर टिव्ट करून ही माहिती देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आहेत. त्याचबरोबर ज्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला त्या भागांच्या नावाची यादीही देण्यात आली असून पूरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी संपर्कहि देण्यात आले आहेत.

सर्तकतेचा इशारा दिलेले भाग
बालेवाडी-हिंजवडी रोड, राजीव गांधी पूल, हिंगणे खुर्द स न. १८, पाटील हॉस्पिटल, सिंहगड रोड, संगमवाडी पूल, भाउसाहेब पाटील पूल

मदतीसाठी संपर्क…..

आपत्ती व्यवस्थापन विभाग टोल फ्री क्र. १०७७
दुरध्वनी – ०२०२६१२३३७१
Email :- [email protected]
जिल्हाधिकारी – ०२०२६११४९४९
अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग – ०२०२६१२६९४१, ९४२२३१६११४
कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग – ०२०२२६१२७३०९, ९४२२५१७३३५

Web Title :- Pune Rain | pune corporation share list of areas likely to affect if water released from khadakwasla dam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये इंडक्शन प्रोग्रॅम

Voter ID Card | तुमचं ‘मतदान कार्ड’ हरवलंय तर ‘नो-टेन्शन’ ! ‘या’ पध्दतीनं करा डाऊनलोड, मिनीटांमध्ये होईल काम; जाणून घ्या प्रोसेस

Benefits of Guava | ताकद वाढवण्यासाठी खा पेरू, ‘या’ आजारांवर खुपच लाभदायक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे