Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

पुणे : Pune Rain | सोमवारी रात्री सुरु झालेल्या पावसाने शहरात हाहाकार उडविला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) तर कमरे इतके पाणी साचले होते. ओढ्याला आलेल्या पुरात अनेक दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. सुखसागरनगर, कात्रज, हडपसर परिसरात पावसाने (Pune Rain) कहर केला आहे. मध्य वस्तीतील अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने ऐन दिवाळीत पाण्याने माल भिजुन खराब झाला आहे. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढे नाल्यांना पूर आला. नाल्यांचे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.

सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच या पावसाने रौद्र स्वरुप धारण केले. काही वेळातच शहरातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. मध्य वस्तीत पावसाचा अधिक जोर होता. हडपसर, नगर रोड परिसर, कात्रज, बिबवेवाडी परिसरात पावसाचा कहर सुरु होता. त्यामुळे आंबील ओढ्याला पुन्हा मोठा पूर आला. त्यामुळे लोकांना २५ सप्टेबर २०१९ ची पुन्हा एकदा आठवण आली आणि काळजाचा ठोका चुकला.

शहरातील नवी पेठ, गणेश पेठ, डुल्या मारुती चौक, हडपसर, साधना बँकेजवळ, नारायण पेठ, कोंढवा, एनआयबीएम रोड, मार्केटयार्ड, नगर रोड, ढोणे बुलेटजवळ, भाऊ पाटील रोड, औंध, आशापुरा सोसायटी भवानी पेठ परिसरात घरामध्ये पाणी शिरले होते. (Pune Rain)

शहराच्या पश्चिम भागापेक्षा पूर्वेकडील भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे.

सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस

वडगावशेरी – १३२
मगरपट्टा – ११६
हडपसर – ११०
शिवाजीनगर – १०४
कोरेगाव पार्क – ९२
पाषाण – ९२
शिरुर – ७१
ढमढेरे – ६८
दौंड – ६१
नारायणगाव – ५७
पुरंदर – ५६
बारामती – ५३
लवळे – ४१
चिंचवड – ३१
गिरीवन – ९

Web Title :- Pune Rain | Pune drowned in rain; Due to the rain, the city was devastated, water entered many houses, the railway station was also submerged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘आम्ही माघार घेतली नसती, तर…’, चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना सुनावलं

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’