Pune Rain | पुणेकरांनो घरीच थांबा ! महापौरांनी दिला पुणेकरांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये जोरदार पाऊस (Pune Rain) पडत आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol) यांनी ट्विट करुन पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापौरांनी म्हटले की, पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Pune Rain) होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

शहरातील पडणाऱ्या पावसाचा (Pune Rain) प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला (disaster management system) योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वत:परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असे महापौरांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष !

मदतीसाठी संपर्क साधा (Contact for help)

आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र

– 020 – 25506800/1/2/3/4
– 020-25501269

Web Title :- Pune Rain | Punekars stay at home! Mayor warns Punekars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lokmanya Festival | नवरात्र उत्सवातील ‘पुणे लोकमान्य फेस्टिवल’मधील कार्यक्रम ऑनलाइन पाहता येणार

Javed Akhtar | वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR

Pune Police Crime Branch | पुण्यात बसमध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त