Pune Rain | पुणे शहर आणि परिसरात आगामी 5 दिवसांमध्ये हलक्या स्वरुपाचा पावसाचा इशारा; घाट माथ्यावर मुसळधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने (Pune Rain) हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस (Pune Rain) कोसळत आहे. गुरुवारी (दि.22) पुणे शहरासह परिसरात मुसळधार पाऊस पडला. पुढील 5 दिवस शहर आणि परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच पुढचे दोन दिवस घाट माथ्यावर मुसळधार पाऊस (Heavy rain) पडेल असाही इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरात (Pune City) गुरुवारी मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात सांयकाळी 5.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर लोहगाव (Lohgaon) येथे 6.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभाग मुंबईच्यावतीने पुणे जिल्ह्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट जारी केला होता. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. दरम्यान आज (शुक्रवार) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तुरळक पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन (Deccan) आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल (Bhide bridge) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्याने भीडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Rain | rain for next 5 days in pune city area imd alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण