Pune Rain | पावसाची धुवाँधार बॅटिंग ; खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी नदीत सोडले, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rain | सोमवारी सायंकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) ९४ टक्के भरले आहे. धरण परिसरात पाऊस (Pune Rain) अजूनही सुरु असून धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी मुठा नदीत (Mutha river) सोडण्यात येत असून नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुणे जिल्ह्यातील (Pune District) वडज धरण (Wadaj Dam) १०० टक्के भरले असून धरणातून ४ हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आंद्रा धरण (Andhra Dam) ८३ टक्के भरले आहे. चिल्हेवाडी धरण (Chilhewadi Dam) ७६ टक्के भरले असून धरणातून २ हजार ५२६ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. (Pune Rain)

 

पानशेत धरण (Panshet Dam) १२ जुलै १९६१ रोजी फुटले होते. आज पानशेत धरण ३६ टक्के भरले आहे. वरसगाव (Varasgaon Dam) ३३ टक्के, टेमघर (Temghar Dam) धरण २२ टक्के भरले असून पवना धरण (Pavana Dam) ३६ टक्के भरले आहे.

 

जिल्ह्यात शिरुर वगळता अन्य सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात वरसगाव १३७, टेमघर १७०, मुळशी (Mulshi Dam) १८६, पानशेत १४१, पवना १३६, आंद्रा ८२, पिंपळगाव जोगे (Pimpalgaon Joge Dam) ४९, माणिकडोह (Manikdoh Dam) ९१, येडगाव (Yedgaon Dam) ५१, वडज ५३, डिंभे (Dimbhe Dam) ४४, विसापूर (Visapur Dam) २, कळमोडी (Kalmodi Dam) ११४, चासकमान (Chaskaman Dam) ६९, भामा आसखेड (Bhama Askhed Dam) ५५, गुंजवणी (Gunjawni Dam) ११५, कासारसाई (Kasarasai Dam) ५३, निरा देवधर (Nira Deodhar Dam) ११५, भाटघर (Bhatghar Dam) ७३, वीर (Veer Dam) ११, नाझरे (Nazareth Dam) १०, उजनी (Ujani Dam) २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

पुणे शहरात काल रात्रभर जोरदार पाऊस पडत होता. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत

 

शिवाजीनगर (Shivajinagar) – ४६,

पाषाण (Pashan) – ५३
लोहगाव (Lohgaon) – ३४.४
चिंचवड (Chinchwad) – ५१.७
लवळे (Lovely) – ६२
मगरपट्टा (Magarpatta) – ३७
तळेगाव (Talegaon) ४७.५
राजगुरुनगर (Rajgurunagar) २५

मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Pune Rain | Rain-soaked batting; 2,568 cusecs of water released from Khadakwasla dam into river, warning people along the river

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा