Pune Rain | हडपसरमधील कुदळे चाळ परिसरातील घरावर मध्यरात्री झाड कोसळले, सुदैवानी कुटुंब बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात कुदळे चाळ (Kudale Chal Hadapsar) येथील एका घरावर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुटुंब बचावले आहे. अग्निशमन जवानांनी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले आहे. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. पुण्यात गेल्या काही दिवंसापासून चांगलाच पाऊस (Pune Rain) पडत आहे. बुधवारी रात्री देखील परिसरात पाऊस (Pune Rain) पडला.

हडपसर भागात कुदळे चाळ (Kudale Chal Hadapsar) येथे दीपक कादबाने हे कुटुंबासमवेत रहावयास आहेत.. त्यांचे बैठे घर आहे. त्यांचा मुलगा पत्नी असे तिघे येथे राहतात. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात अधूनमधून हलके वारे देखील येत आहे. त्यामुळे झाडपडीच्या घटना घडत आहेत. दीपक यांच्या घराला लागून जुने लिंबाचे झाड होते. काल मध्यरात्री अचानक हे झाड कोसळले. दीपक यांच्या घरावरच ते कोसळले. दीपक व कुटुंब झोपेत असताना हा प्रकार घडला. पत्र्यावर झाड पडल्याने मोठा आवाज झाला. त्यावेळी दीपक व त्यांचे कुटुंब आणि शेजारचे रहिवाशी खडबडून जागे झाले. सुदैवाने यात दीपक कुटुंब सुखरूप आहेत. पण त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन जवानांनी धाव घेत काम करण्यास सुरुवात केली. हे झाड कापून पूर्ण बाजूला करण्यात आले आहे.

कोंढवा फायर स्टेशनचे (kondhwa fire station) अनिल गायकवाड, मंगेश काळे, सागर दळवी, सुभाष खाडे, धर्मराज माने, हर्षद येवले, अनिकेत गोगावले यांनी झाड कापून बाजूला केले.

Web Title :- pune rain | tree fall on home in kudale chal of hadapsar area in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी