Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rain | पुणे शहरात झालेल्या पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली. मध्यराञी पुणे स्टेशन (Pune Station), अलंकार टॉकीज (Alankar Talkies) येथे मोठे झाड कोसळले. पहाटे बिबवेवाडी (Bibwewadi), झाला कॉम्प्लेक्स येथे झाड पडून एमएनजीएलची गॅस वाहिनी तुटली असून जखमी कोणी झाले नाही. अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवानानी झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला असून गेल्या दोन दिवसात दलाकडे पाऊसामुळे १४ झाडपडी तर ७ ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटच्या (Electric Short Circuit) घटनांची नोंद करण्यात आली आहे. (Pune Rain)

 

मगरपट्टा येथे ३६.५ मिमी पाऊस

शहरात बाप्पाचे (Ganeshotsav 2022) आगमन होत असताना बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मगरपट्टा येथे ३६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) आणि पाषाण (Pashan) येथे १३ मिमी, लोहगाव (Lohgaon) येथे २७.९ आणि चिंचवड (Chinchwad) येथे १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune Rain)

 

सकाळी ऊन तसेच वाढलेली आर्द्रता यामुळे पावसासाठी स्थानिक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

 

Web Title :- Pune Rain | Trees fell at 14 places due to rain in Pune;
Gas line broken, electric short circuit incidents at 7 places

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा