Homeशहरपुणेनीरा देवघर, गुंजवणी धरणही शंभरीकडे

नीरा देवघर, गुंजवणी धरणही शंभरीकडे

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंम्मदगौस आतार) –   नीरा खो-यातील नीरा देवघर व भाटघर धरण परिसरात गेेेल्या आठवड्यापासून

पाऊस सुरू असल्याने भाटघर धरण पुर्ण भरल्याने धरणातून विसर्ग सुरू.आहे. तर नीरा देवघर धरण शुक्रवारी (दि.२१) संध्याकाळी पाच वाजता ९४.८६ टक्के व गुंजवणी धरण ९६.९८ टक्के भरून शंभरीकडे वाटचाल करीत आहे. तर वीर धरणामधून २३ हजार ९८५ क्युसेक्सने नीरा नदीत विसर्ग सुरू असल्याने दुस-यांदा नीरा नदी दुधडी भरून वाहत आहे.

नीरा खो-यातील भाटघर , वीर धरण सुुुमारे पंंदरा दिवसांंनी उशिरा भरलेलेे असले तरी भाटघर मधूूून मानव निर्मित ( मँन्युअल ) १३ दरवाजातूूून ९ हजार ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता. तसेेेच वीर धरण १०० टक्के पुुर्ण क्षमतेने भरल्याने वीर धरणामधून शुक्रवारी (दि.२१) दुस-या दिवशीही सकाळी दहा वाजल्यापासून २३ हजार १८५ क्युसेक्स व वीज निर्मिती केंद्रातून ८०० क्युसेक्स असे २३ हजार ९८५ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे.

मात्र नीरा देवघर धरण परिसरात शुक्रवारी (दि.२१) १९ मि.मी. पाऊस पडल्याने नीरा देवघर धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने धरण ९४.८६ टक्के भरले आहे. तर गुंजवणी धरण परिसरात शुक्रवारी (दि.२१) दिवसभरात ३३ मि.मी. पाऊस पडल्याने धरण ९६.९८ टक्के धरण भरून नीरा देवघर व गुंजवणी धरण या हंगामात शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

दरम्यान, नीरा नदीपात्रात वीर धरणामधून २३ हजार ९८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नीरा नदी दुस-या दिवशीही दुधडी भरून वाहत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे वीर धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदी काठच्या रहिवांशाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News