पुण्यातील पावसामुळे लाखो रुपयांच्या औषधांचे नुकसान, व्यापार्‍यांचे ‘हाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले. घरामध्ये आणि दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंहगड रोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी मेडीकल दुकानात शिरल्याने दुकानातील लाखो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले आहे. पुणे मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीपासून मदत कार्य सुरु केले असून उद्यापर्यंत व्यवहार सुरळीत होतील असे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

  

श्री मेडीकल तिरकटवाडी, श्री मेडीकल वडगाव बुद्रुक, मधुकर मेडीकल आनंदनगर, सिद्धी मेडीकल या दुकानांसह इतर दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. रात्रीपासून मेडीकल असोसिएशनचे पदाधीकारी यांनी दुकानातील औषधे सुरक्षीतस्थळी पोहचवण्यासाठी मदत करत आहेत.

सध्या घटनास्थळावर मदत कार्य सुरु असून उद्यापर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, खासदार गिरीश बापट यांनी फोनवरून संपर्क साधत व्यापाऱ्यांना होईल तेवढी मदत करा असे आवाहन संघटेनच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.


पुणे मेडीकल असोसिएशनचे अनिल बेलकर, संजय शहा, अमोल बदे, संजय तरडे, केतन शर्मा, भरत चौधरी, विशाल ओव्हाळ, अमोल परदेशी, आकाश जाधव, सौरभ काटे, रोहित करपे ,सागर सेठ ,हितेश ओसवाल , मंदार देशमुख यांनी रात्रीपासून मदतकार्य़ सुरु केले असून दुकानांमधील वस्तू सुरक्षीतस्थीळी हलवण्यात येत आहेत.

 

Visit : policenama.com