Pune Rains | माजी आमदार मोहन जोशी यांची पुणे BJP वर खरमरीत टीका; म्हणाले – ‘पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains | मुसळधार पावसामुळे (Pune Rains) शहरात शनिवारी साचलेले पाणी, रस्त्यावरचे जागोजागी पडलेले भयावह खड्डे यातून महापालिकेतील (PMC) सत्ताधारी भाजपचा (BJP) अपयशी कारभाराचाच पंचनामा झाला, अशी खरमरीत टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

 

 

गेले काही महिने शहरातील सर्वच रस्त्यांवर भयावह खड्डे पडले आहेत. रस्ते दुरुस्तीही सत्ताधारी भाजपला जमलेली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी केली, साध्य काहीही झाले नाही. मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मीरोड (Laxmi Road) तर दुरुस्ती नंतर अधिकच बिघडला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. गेले दोन, तीन वर्ष सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस (Pune Rains) पडतो आणि भीषण परिस्थिती उदभवते. हे लक्षात घेऊन सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करायला हवी होती. परंतु, टक्केवारीत रमलेल्या महापालिकेतील (Pune Corporation) भाजप नेत्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे कात्रज, बिबवेवाडी, धानोरी, बालेवाडी वगैरे उपनगरांमधील रस्ते पाण्यात बुडाले. तास, दीडतासाने पाणी ओसरल्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पावसात (Pune Rains) अडकलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. या पावसाने स्मार्ट सिटी म्हणून उदोउदो करणाऱ्या भाजपच्या कारभाराचा पंचनामाच केला, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले.
रस्त्या़ंची कामे निकृष्ट दर्जाची झाली. दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा करण्यात आला.
याबाबत भाजपचे नेते खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), आमदार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे गप्प आहेत.
आपल्या नगरसेवकांना जाब विचारण्याचे धाडस त्यांच्यात नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

 

 

स्मार्ट सिटी म्हणून निवडलेल्या बाणेर, बालेवाडी भागातही पावसामुळे वाहतूक कोंडी झाली.
अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title :- Pune Rains | Former MLA Mohan Joshi’s harsh criticism on Pune BJP; Says – ‘Rain made BJP’s failure panchnama’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Moshi-Chandoli Toll Plaza | मोशी आणि चांडोली येथील दोन्ही टोलनाके कायमस्वरूपी बंद !

Jalgaon Police Recruitment | WhatsApp च्या माध्यमातून पोलिस भरतीचा पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं (व्हिडीओ)

Pune News | धनकवडीमधील शेवटचा बसस्टॉप येथे ‘विठू माऊली भक्ती शिल्पा’चे लोकार्पण