Pune Rains | पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु; पूर परिस्थिती भागात लष्कर, एनडीआरएफ तैनात

rain
ADV

पुणे : Pune Rains | कालपासून शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मागील महिन्यात एका दिवसाच्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गामुळे पुण्यातील नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. (Heavy Rain In Pune)

आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रशासनास पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. (Pune Flood)

कालही (दि.३) महापालिका, जलसंपदा विभाग, अग्निशमन दल यांना सूचना देण्यात आल्या होत्या. पाणी सोडण्याअगोदर लोकांना सूचित करा, सायरन वाजवा असे सांगण्यात आले आहे. लष्कराशी आमचे बोलणे झाले आहे. जिकडे पूरपरिस्थिती आहे तिकडे एनडीआरएफ आणि लष्कर तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी, केळकर, फर्ग्युसन, बाजीराव, जंगली महाराज रस्ता याचबरोबर स्वारगेट, हडपसर, धनकवडी, धायरी उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांच्या पूर रेषेतील आणि सखल भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाला उपाययोजनेचे निर्देश दिलेले आहेत.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून २६.९९ टीएमसी पाणी वाढले असून ९२.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तर आज सकाळी ११ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू
असणारा २९ हजार ४१४ क्युसेकने होणारा विसर्ग वाढवून ३५ हजार २ क्यूसेक करण्यात आला आहे.
मुळशी धरणातून मुळा नदीत सुरु असणारा २४ हजार ७४५ क्युसेक विसर्ग वाढवून
दुपारी १ वाजता २७ हजार २८२ करण्यात येणार आहे.

धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगर,
सरिता नगर, डेक्कन नदीपाञ, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी येथे व
इतरत्र ठिकाणी दलाचे अधिकारी व जवान टॉर्च, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग,
मेगा फोन्स व बोट अशा बचाव साहित्यासह तैनात असून मेगा फोनवरुन सूचना देण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Amit Shah | ‘अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह’ उद्धव ठाकरेंची जहरी टीका; म्हणाले – “ढेकणं चिरडायची असतात…”

Vijay Kedia | दिग्गज गुंतवणुकदाराचे गाणे गाऊन अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना साकडे, व्हिडिओ जबरदस्त व्हायरल, यूजर्सच्या प्रतिक्रिया लक्षवेधक

Total
0
Shares
Related Posts