Pune Rains | पुण्यासह पालघर, नाशिकमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains | मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या (Rain) सरी कोसळल्या आहेत. तर काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (बुधवारी) 15 सप्टेंबर रोजी पालघर (Palghar), नाशिक (Nashik) आणि पुण्यात (Pune Rains) जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. आगामी 3 दिवस कोकणात अनेक भागात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather update) वर्तवली आहे.

मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी दिवसभरात पुण्यामध्ये 0.9 मिलिमीटर, सांगली आणि कोल्हापुरात प्रत्येकी 0.2 मि.मी., साताऱ्यात 2 मि.मी., महाबळेश्वर येथे 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डहाणूत 6 मि.मी., रत्नागिरीत 1, तर सांताक्रुझ येथे 2 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक तापमान सोलापुरात 33.4 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी महाबळेश्वर येथे 17.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील उत्तर भागाकडे तयार झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या अंतर्गत असलेल्या उत्तरेकडे सरकले आहे.
सध्या हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण-पूर्व ओडिशाच्या किनोजहारागडपासून 50 किलोमीटर,
तर चंदबेलीपासून 100 कि.मी. अंतरावर आहे.
तर, आगामी 24 तासांमध्ये हे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश टप्पा पार करणार आहे.
तसेच, 12 तासात या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे.

या दरम्यान, दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागावर देखील गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्याची तीव्रता देखील आणखी 1 दिवस राहणार आहे.
यावरुन आता मुंबई आणि कोकण (Mumbai and Konkan) किनारपट्टी परिसरात पावसाची गती वाढणार आहे.

Web Titel :- Pune Rains | heavy rain forecast for palghar nashik pune today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

Udayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण

Jalna Crime | पावसामुळे ओला दुष्काळ ! मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नाही, हवालदिल तरुणाने उचललं टोकाचं पाऊल