Pune Rains | आगामी 5 दिवस पुण्यात ‘मुसळधार’ पाऊस ! IMD कडून अलर्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Rains | राज्यात सर्वत्र पावसाने गेल्या आठवड्यापासुन धुमाकूळ घातला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, (Pune Rains) पश्चिम, उत्तर महाराष्ट्र पावसाने चांगलंच झोडपुन काढलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात (Marathwada) तर पावसाने दाणादाण केली आहे. अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाल्याने तेथील बळीराजा अधिक चिंतेत पडला आहे. यानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र कोकणात (Konkan) पावसानं अधिक गती घेतली आहे. आज कोकण आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला आहे. आगामी 24 तासात याठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मागील आठवड्यापासून पुणे शहरासह (City of Pune) जिल्ह्यात अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. आगामी पाचही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्यापासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आजपासून पुढील 3 दिवस पुण्याला येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
तर 13 आणि 14 सप्टेंबर रोजी हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) पुण्यात ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.
या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

 

अनेक जिल्ह्यात (Rain in Maharashtra) 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आकाशात विजांचा कडकडाही होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाखाली उभं राहू नये, असा सल्ला देखील हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, उद्या रत्नागिरी जिल्ह्याला मात्र ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
पण विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 12 सप्टेंबरनंतर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज आणि येलो अलर्ट (Orange and Yellow Alert) दिले आहेत.
13 आणि 14 सप्टेंबर रोजी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

 

Web Title : Pune Rains | heavy rainfall possible in pune for next 5 days imd give yellow and orange alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक