Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Pune | पुणे परिसरात मुसळधार पाऊस (Rain in Pune) सरु असताना बुधवारी (दि.13) दुपारच्या वेळी कात्रज जुन्या बोगद्याजवळ (Katraj Old Tunnel) दरड कोसळल्याची (Darad Collapse) घटना घडली आहे. रस्त्यावर दगड आले होते. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे (Dhankawadi Sahakar Nagar Regional Office) आपत्ती निवारण पथक (Disaster Management Squad) या ठिकाणी रवाना झाले. त्यांच्याकडून रस्त्यावरील दगडे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्याची माहिती धनकवडी सहायक आयुक्त विजय वाघमोडे (Dhankawadi Assistant Commissioner Vijay Waghmode) यांनी दिली.

 

कात्रज जुना बोगदा परिसरात दरड कोसळल्यामुळे घाटात वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. मागील सात ते आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये (Rain in Pune) वाढ होत आहे. यामुळे रस्त्यावर दगडी व झाडांच्या फाद्या आल्या होत्या. आजच्या या घटनेसह तिसऱ्यांदा ही दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता पुढील काही दिवसांसाठी धोकादायक बनला आहे. डोंगरावरुन चार ते पाच मोठे दगड खाली आले होते. त्यापैकी दोन दगड रस्त्याच्या मधोमध होते. सुदैवाने यामध्ये कोणताही अपघात झाला नाही. मात्र, काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. मागील 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

 

कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा असून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे आहे.
परंतु देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून अधिकारी हात झटकत असल्याचे पहायला मिळत आहे.
अशावेळी दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.

 

Web Title :- Pune Rains | Landslide At Old Katraj Tunnel Fire Brigade Team Rushed To Spot

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा