Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains |  पानशेत, (Panshet) वरसगाव, (Varasgaon) खडकवासला (Khadakwasla) टेमघर धरण परिसरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून रात्री १८ हजार क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीत (Mula Mutha River) करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले होते. त्याचवेळी पावसाचा जोर आणखी वाढला तर धरणातून अधिक पाणी सोडावे लागले असते. त्यामुळे पुणे शहरात पुराचा धोका वाढला होता. सुदैवाने रात्रीत पावसाचे (Pune Rains) प्रमाण कमी झाल्याने आज सकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग ४ हजार २६० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील पुराचा धोका सध्या तरी टळला आहे.

गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून १८ हजार ४९१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तातडीने नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला. खडकवासला (Khadakwas) धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी मध्यरात्रीनंतर पुणे शहरात (Pune city) आले. त्यामुळे शिवणे – नांदेड हा पुल पाण्याखाली बुडाला. तसेच डेक्कन जिमखान्यावरील बाबा भिडे पुल (Baba Bhide Bridge) पाण्याखाली गेला.

नदी पात्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) येथे नदीपात्रात अनेक जण आपली वाहने पार्क करतात. रात्री पार्क करुन ठेवलेली काही वाहने या पाण्यामध्ये अडकली आहे. आज सकाळी ७ वाजताही मुठा नदी दुथडी भरुन वाहत होती. काही वेळानंतर हे पाणी ओसरण्यास सुरुवात होईल.

वरसगाव व पानशेत धरण (Panshet Dam) क्षेत्रात गेल्या २४ तासात १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वरसगाव ५८ टक्के, पानशेत ६७ टक्के भरले आहे. सध्या पानशेतमधून १०५७ क्युसेक आणि वरसगाव धरणातून १०३२ क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. टेमघर परिसरात २७० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ४१ टक्के भरले आहे. धरणातून १४९० क्सुसेक पाणी नदीत सोडले जात आहे.

खडकवासला धरण (Khadakwas Dam) प्रकल्पातील चारही धरणात मिळून १८़१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणे ६२ टक्के भरली आहेत.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी या चारही धरणात मिळून एकूण ९़ ७३ टीएमसी पाणीसाठा होता. तो ३३ अक्के इतका होता.
दोन दिवसांच्या पावसाने खडकवासला प्रकल्पातील धरणातील पाणीसाठा दुप्पट झाला आहे.
खडकवासला परिसरात गेल्या २४ तासात २० मिमी पाऊस झाला आहे.

मात्र वरसगाव व पानशेत धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे खडकवासला धरण हे १०० टक्के भरत आले होते.
त्यामुळे धरणातून रात्री १० वाजता १८ हजार ४९१ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले.
सध्या धरणातून ४ हजार २६० क्युसेक तसेच उजव्या कालव्यातून १०५४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
सध्या धरण ९५ टक्के भरले आहे.
पाऊस वाढला तर खडकवासला धरणातून सोडण्यात येणार्‍या विसर्गाता वाढ करावी लागणार आहे.

Web Title : Pune Rains | Flood threat averted in Pune! The discharge from Mutha river increased from 18 thousand to 4 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कात्रजमधील ‘चुहा गँग’वर मोक्का कारवाई