Pune Rains | पुण्यात एकाच दिवसात 80 मिमीची ‘बरसात’ वडगाव शेरीत 100, गिरीवनला 149 मिमी पावसाची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains |गेल्या २ दिवसांपर्यंत जुलै महिन्यात एकूण केवळ २५ मिमी पाऊस झाला असताना शुक्रवारी एकाच दिवसात शहरात ८० मिमी पावसाची बरसात झाली. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) १८ हजार ४९९ क्युसेक पाणी नदीत (River) सोडण्यात येत असून शहरातील मुठा नदी (Mutha River) दुथडी भरुन वाहत आहे.

शहर व परिसरातही चांगला पाऊस झाला आहे. शिवाजीनगर (Shivajinagar)  येथील हवामान विभागाच्या(Meteorological Department)  केंद्रात ८०.३ मिमी, पाषाण येथे ६९.७ मिमी, लोहगाव येथे ६०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) गिरीवन १४९, पाषाण १०५, एनडीए ७३.५, पुरंदरमधील वाल्हे ३२, खेडमधील वेताळे ४०.५, मगरपट्टा ४२, डुडुळगाव ३०.५़ चिंचवड ६४.५, वडगावशेरी १००.५, शिरुर तालुक्यातील पाबळ येथे १ आणि तळेगाव ढमढेरे ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शहरातील धरण परिसरातही सलग तिसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस पडला.
मुळशी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात २०१ मिमी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत येथे १६३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
टेमघर १९०,
वरसगाव १८८,
पानशेत १९३,
खडकवासला ५८,
पवना १२०,
कळमोडी १२४,
भामा आसखेड ८१,
कासारसाई ७०,
वडिवळे १८७,
गुंजवणी १७३,
निरा देवधर २५५,
भाटघर ९२,
वीर २५,
नाझरे १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात मिळून आता ६९ टक्के पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरण ९४ टक्के भरले असून सध्या धरणातून १८ हजार ४९९ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे.
त्यामुळे शहरातून वाहणारी मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page ,
Follow us instagram  and Twitter for every update


Web Title : Pune Rains |  Pune received 80 mm of rainfall in a single day