ताज्या बातम्यापुणे

Pune : हडपसरमधील पुष्पक रुग्णवाहिकेचे चालक राजेंद्र चव्हाण यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसरमधील शहिद भगतसिंग प्रतिष्ठानच्या माध्यमातील पुष्पक रुग्णवाहिकेचे चालक राजेंद्र बाळासाहेब चव्हाण (रा. हडपसर, मूळ देहूगाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

हडपसर पंचक्रोशीमधील सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांकडे त्यांचा भ्रमध्वनी होता, त्यांना कधीही कोणत्याही वेळी नागरिक फोन करून बोलावत होते. मागिल सोळा वर्षे अविरत सेवा देण्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी त्यांना फोन केला तरी त्यांची पुष्पक रुग्णवाहिका घेऊन ते हजर होत होते. मयत येणार आहे, असे त्यांना सांगितल्यानंतर ते तातडीने स्मशानभूमीत हजर राहत असत, तसेच विधीचे साहित्य, दशक्रियाविधीचे साहित्य वेळेत आणून देण्यासाठी त्यांचा हिरीरीने सहभाग होता. आतापर्यंत त्यांनी हडपसरमधील स्मशानभूमीमध्ये आलेल्या मयताला खांदा दिल्याशिवाय त्याची वाट पूर्ण होत नव्हती, कोणाही व्यक्तीचा अंत्यविधी करताना कुटुंबातील सदस्यांचाच ते विधी करत असत, एवढ्या आपुलकीने ते काम करीत होते. एवढे त्यांचे जवळचे नाते निर्माण झाले होते. त्यांनी आज हडपसरवासियांचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरली आणि सोशल मीडियावर शोक संदेश आणि अश्रूंचा पाऊस पडला. हडपसरवासियांचे खांदेकरीच हरपले अशा शब्दात त्यांना सामान्यांपासून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

Back to top button