‘कोरोना’च्या भीतीने आजोबांनी उचलले धक्कादायक पाऊल

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या भाीतीमुळे राजगुरूनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाने स्वःताचा गळा कापून केली आत्महत्या केली आहे. कोरोना टेस्ट पुन्हा बाधित येणार म्हणून नैराश्यात येऊन आत्महत्या केली. खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात ही घटना घडली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर असे या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते. त्यांना याचा तीव्रतेने त्रास जाणवत होता. शुक्रवारी त्यांचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल येणार होता. पण त्रास कमी होत नसल्याने जुन्नरकर यांनी झोपल्यावर खोलीतील बाथरुममध्ये सुरीने व कात्रीने स्वःताचा गळा कापून आत्महत्या केली. सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर वडील बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे दिसून आले.