रांजणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई, जप्त केले तब्बल 20 मोबाईल

शिक्रापुर : पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांनी पदभार स्विकारताच पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलिसांनी देखील धडाकेबाज कारवाई करत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकिस आणला तब्बल सुमारे २० मोबाईल संच जप्त करत चार आरोपींना अटक केली आहे.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यानुसार,रांजणगाव पोलिसांनी तपास पथक तयार करुन वेगवेगळे गुन्हयाच्या अनुशंगाने तपास करत होते.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार ,योगेश प्रकाश देवकर(वय.२३ वर्षे),सुरज श्रीधर नरवडे(वय.२४ वर्षे),सुग्रीव दत्ताञय कोटमाळे(वय.२६ वर्षे) तिघेही रा.फलकेमळा,कारेगाव, शहबाज इक्बाल सय्यद(वय.२५,रा.कोटला रोड,मस्तान शहा चौक,अहमदनगर) या आरोपींना ताब्यात घेउन कसोशीने चौकशी केली असता आरोपींकडुन चोरीचे २० अॅड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी असा पोलिसांनी एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील आरोपींकडुन रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकिस आणले असुन आरोपींकडुन आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता रांजणगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हा तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,सहा.फौजदार दिलीप शिंदे,पोलिस हवालदार संजीव गायकवाड,तुषार पंदारे,विनायक मोहिते,किशोर तेलंग,अजित भुजबळ,उद्धव भालेराव,अमोल नलगे,रघुनाथ हाळनोर यांनी केला आहे.