Pune : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने लग्नाला नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी आमिर अनिश खान (रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार 2016 ते 2020 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी तरुणाची ओळख होती. ओळखीनंतर तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखविले व विश्वास संपादन केला. तर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याने नकळत शारीरिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ काढले होते. तर दोन वेळा गर्भवती ठेवले होते. त्यानंतरही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.