Pune : खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिलेला अज्ञातस्थळी नेले, बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भल्या सकाळी लिफ्टच्या बहाण्याने एका 45 वर्षीय महिलेला एका अज्ञात ठिकाणी नेहून बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तर बलात्कारानंतर नराधम महिलेचे 1 लाखाचे दागिने घेऊन पसार झाला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात राजेश कांबळे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरकाम करते. राहण्यास सांगवी परिसरात आहे. दरम्यान महिला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त जाण्यासाठी बसची वाट पाहात फातिमानगर बस स्टॉपवर थांबल्या होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्ती आली. त्याने तुम्हाला लोणी परिसरात सोडतो असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी या दुचाकीवर बसल्या.

त्यानंतर त्याने ऑफिस दाखविण्याच्या बहाण्याने मुंढवा परिसरात नेले. तसेच सोन्याचे दागिने काढून ठेवा असे म्हणत दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच काढून ठेवलेले दागिने घेऊन पसार झाला. यानंतर पीडित महिलेने नियंत्रण कक्षाला फोन केला व माहिती दिली. त्यानंतर त्या हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्याठिकाणी चौकशी झाल्यानंतर सर्व घटनेची माहिती घेऊन त्यांना मुंढवा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like