Pune Rape Case | पुणे स्टेशन परिसरात आईजवळ झोपलेल्या 6 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विद्येचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील वानवडी परिसरात एका 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन (Pune station) परिसरात आईजवळ झोपलेल्या 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन एका रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार (Pune Rape Case) केला. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पुण्यामध्ये महिला खरचं सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे स्टेशन परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे 39 वर्षाच्या रिक्षाचालकाने अपहरण केले.
यानंतर तिला मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणीतील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन येथे आईच्या जवळ झोपलेल्या मुलीला रात्री एकच्या सुमारास उचलून रिक्षात घालून मार्केटयार्ड परिसरात नेले. याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

काहीवेळाने आईला जाग आली. तिला मुलगी दिसली नसल्याने तिने समोर असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्र फिरवली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता आरोपी मार्केटयार्ड परिसरात गेल्याचे दिसले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
या घटनेत पीडित मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Web Title : Pune Rape Case | pune rape of 6 year old girl sleeping on the sidewalk in the station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले ! महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’; शहर भाजपच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांची माहिती

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

MP Bhavana Gavali | खा. भावना गवळींकडून जिवाला धोका; ‘या’ शिवसेना नेत्याचा खळबळजनक आरोप