Pune Rape Case | पुण्यात सोशल मिडियावरील ओळखीतून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : Pune Rape Case | सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अरुण सोमनाथ शिंदे (वय 21, रा. पिंपरी, नातेपुते, सोलापूर) याला अटक (Pune Rape Case) केली आहे.

याप्रकरणी एका 17 वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते जुलै 2021 पर्यंत घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी मुळची उत्तर प्रदेशातील राहणारी आहे. तिचे Instagram वरुन आरोपी अरुण शिंदे याच्याबरोबर ओळख झाली होती. अरुण शिंदे याने या मुलीला ते लग्न करणार असल्याचे सांगून गेल्या 6 महिन्यांपासून वेगवेगळ्या लॉजवर तसेच भाड्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्याशी शारिरीक संबंध केले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण शिंदे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.

हे देखील वाचा
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सराईत गुन्हेगारांकडून हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न; वैष्णव झांबरे आणि महेश उबाळेला अटक, 6 जणांवर FIR

NABARD | नाबार्डचे कर्ज आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 25.2 टक्के वाढून 6 लाख कोटी रुपयांवर पोहचले

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केली ‘ही’ चूक तर होईल 3 वर्षांचा कारावास, भरावा लागेल दंड; जाणून घ्या

GST | कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! AAR ने म्हटले – ‘कँटीन चार्जवर लागणार नाही जीएसटी’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Rape Case | rape on 17 years old girl instagram loni kalbhor police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update