Pune : कोंढव्यातील शिक्षकानं क्लासमधील विद्यार्थीनीवर केला बलात्कार, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करतो, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, करियर गाईडन्स करणार्‍या कॅप्टन मनात कोचिंग क्लासेसमध्ये मोसीन शेख हा शिक्षक आहे. या तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणे बाकी आहे. गेल्या वर्षी आक्टोंबर २०१९ मध्ये मोसीन शेख याने कॉलेजमध्ये करिअर गाईडन्सवर लेक्चर दिले होते.

त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपला मोबाईल नंबर दिला होता. या तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी मोसीन शेख याला फोन केला. त्यांनी कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये मोसीन शेख याला भेटली. त्याने इटंरन्स परिक्षेचा फॉर्मचे १२०० रुपये आणि क्लासचे ७ हजार रुपये फी सांगितली. ८ जुलैला क्लास सुरु झाला. पण ही तरुणी पैसे भरु शकत नसल्याने क्लासला गेली नाही.

त्यांनी तिला संपर्क साधून कुंभारवाडा येथे बोलावले. तिला फीचे मी पाहतो, असे सांगून कारमध्ये बसवून अशोका म्युज येथे मित्राकडे काम असल्याचे सांगून तिला घेऊन गेला. तेथे त्याने या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला ही गोष्ट कोणाला सांगू नको, म्हणून धमकावले. दुसर्‍या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस मोसीन शेख याचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like