बारामतीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, परिसरात प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमाच्या ढोंग करून एका १७ वर्षीय मुलीला फिरण्यास घेवून जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार बारामती शहरात घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

अमर खन्‍ना गागडे (२३, रा. वाघळवाडी-सोमेश्‍वरनगर, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. दि. २१ मे ते जून २०१९ दरम्यान ही घटना घडली आहे. सुरवातीला शहरातील एका कॉलेजच्या कॅन्टीनसमोरच अमरने पिडीतेला गाठले आणि तिचा हात धरून प्रेमाबाबत सांगत तिचा विनयभंग केला. प्रेमाचे नाटक करून अमरने पिडीत मुलीला जून महिन्यात बारामती-मोरगाव रस्त्यावरील एका लॉजवर नेले आणि तिच्या जबरदस्तीने अत्याचार केले.

पोलिस ठाण्यात पिडीतेने फिर्याद दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अमरला अटक करण्यात आली आहे. याप्ररकणामुळे बारामती शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like