धक्कादायक ! ‘जादूटोणा’ करून ‘ढोंगीबाबा’ सोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडून महिलेवर ‘बलात्कार’

वाघोली :पोलीसनामा ऑनलाइन  ( कल्याण साबळे पाटील) –  पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एका महिलेच्या पतीने घेतलेले उसने पैसे आणि त्या पैशातील व्यवहारातून महिलेशी ओळख करून ओळखीतून मैत्री निर्माण करून महिलेवर दहशत निर्माण करून तसेच महिलेवर जादूटोणा करून ढोंगीबाबा सोबत देखील शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडून महिलेवर बलात्कार करून मारहाण तसेच गर्भपात केल्याची घटना घडली असून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे येथील पिडीत महिलेच्या पतीने काही आर्थिक अडचणीमुळे पेरणे गावातील राहुल वाळके यांचेकडून काही पैसे घेतले होते, त्यांनतर राहुल हा महिलेच्या घरी येऊ लागला आणि त्यानंतर त्यांची ओळख होऊन ओळखीतून मैत्री झाली त्यानंतर राहुल हा त्या महिलेला पैसे द्या या कारणातून दहशत निर्माण करून पैशाची मागणी करू लागला नंतर महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून नकार दिल्यास महागात पडेल अशी धमकी देत राहुल ने पिडीत महिलेवर बलात्कार केला.

त्यांनतर महिलेला गुंगीचे औषध देत स्वतः नशापान करून राहुल ने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला त्यानंतर महिलेने नकार दिल्यानंतर तिच्यावर जादूटोणा करून महिलेला संमोहित करू लागला आणि त्यानंतर एका ढोंगी बाबा बरोबर महिलेला विविस्त्र करून महिलेला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला आणि आम्ही जादूटोणा करून तुमचे जगणे असह्य करू अशी धमकी देत भीती दाखविली त्यांनतर राहुल याने पिडीत महिलेवर वारंवार बलात्कार करून महिलेला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जात महिलेच्या पतीच्या खोट्या सह्या करून महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले.

त्यानंतर पिडीतेला सर्व काही प्रकार असाह्य झाल्यानंतर देखील राहुलच्या पालकांनी पिडीत महिलेवर जीवघेणा हल्ला करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली, याबाबत पिडीत महिलेने पूर्वी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रारी देखील दाखल केलेल्या आहेत, तसेच महिलेला वारंवार त्रास देऊन केलेल्या कृत्याबाबत कोणासही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तर याबाबत पिडीत महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने लोणीकंद पोलिसांनी राहुल संजय वाळके रा.पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे याचे विरुद्ध बलात्कार, गर्भपात, मारहाण केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कायद्याखाली गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/