Pune Rathi Murder Case | पुण्यातील 1994 सालच्या राठी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट! सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुण्यात गाजलेल्या राठी हत्याकांड प्रकरणात (Pune Rathi Murder Case) मोठी अपडेट आली आहे. ज्यावेळी गुन्हा (Pune Crime News) घडला त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी हा अल्पवयीन (Minor) होता हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी (Narayan Chetanram Chaudhary) असं या आरोपीचे नाव आहे. राठी हत्याकांडातील (Pune Rathi Murder Case) आरोपी चौधरी हा गेल्या 28 वर्षापासून तुरुंगात आहे. आज त्याला सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहे.

 

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी नारायण चेतनराम चौधरी हा या गुनह्याच्या वेळी केवळ 12 वर्षांचा असल्याने त्याची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश कोर्टाने सोमवारी (दि.27) दिले. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस (Justice Aniruddha Bose), न्यायमूर्ती केएम जोसेफ (Justice KM Joseph) आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय (Justice Hrishikesh Roy) यांच्या खंडपीठाने आरोपी गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा योग्य असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर त्याला सोमवारी तात्काळ सोडून देण्याचे आदेश दिले.

 

नारायण चौधरी याने 1994 साली पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता. या प्रकरणात नारायण चौधरी याला अटक करण्यात आली होती. चौधरी याने राठी हत्याकांड प्रकरणात (Pune Rathi Murder Case) 28 वर्षे शिक्षा भोगली आहे.

हा खटला सुरु असताना आरोपीचे वय 20 ते 22 असल्याचे नोंदवण्यात आले होते.
या खटल्यात आरोपी चौधरी आणि त्याच्या दोन साथिदारांपैकी एक साथिदार जितेंद्र गेहलोत (Jitendra Gehlot)
याने राष्ट्रपतींकडे (President) दयेचा अर्ज केला होता. त्यानंतर त्याची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलण्यात आली.
आरोपी नारायण चौधरी याने आपला दयेचा अर्ज मागे घेऊन ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो,
असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

 

आरोपी नारायण चौधरी याचे राजस्थानमधील त्याच्या शाळेच्या दाखल्यात नोंदवलेल्या जन्म तारखेची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये तो अल्पवयीन होता हे सिद्ध झालं. परंतु तो त्याचे वय सिद्ध करु शकला नाही.
कारण हा गुन्हा महाराष्ट्रात घडला होता आणि त्याने महाराष्ट्रात दीड वर्षे शिक्षण घेतले होते.

 

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये पुण्याच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना (Principal District and Sessions Judge, Pune)
आरोपीचे वय तपासण्याचे निर्देश दिले.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालाने गुन्हा घडला त्यावेळी आरोपी हा
अल्पवयीन असल्याचे सांगत त्याची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले.

 

Web Title :- Pune Rathi Murder Case | rathi murder case in pune supreme court orders release of death row convict after finding he was child at time of crime 28 years after murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार