Pune Real Estate | पुण्यात बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस; विक्रीत 43 टक्क्यांची वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनानंतर (Corona) बांधकाम क्षेत्रातील मंदी आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. प्रॉप टायगर संस्थेने (Prop Tiger Institute) नुकताच देशातील प्रमुख शहरातील निवासी बांधकाम क्षेत्राचा आढावा घेणारा अहवाल सादर केला असून त्यावरून मंदीचे सावट दूर झाल्याचे दिसत आहे. पुण्यातीलही बांधकाम क्षेत्राची (Pune Real Estate) स्थिती मांडली असून यंदा जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत नवीन सदानिकांचा पुरवठा 116 टक्क्यांनी पुण्यात (Pune Real Estate) वाढला आहे. त्याचबरोबर विक्रीत देखील 43 टक्क्यांची वाढ झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ती जास्त आहे. घरांच्या विक्रीत देशात पुणे दुसऱ्या स्थानावर आहे.

‘प्रॉप टायगर संस्थे’ने पुण्यासह, मुंबई, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, कोलकता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या आठ प्रमुख शहरांतील बांधकाम क्षेत्राचा आढावा घेतला आहे. पुण्यात जुलै ते सप्टेंबर 2021 या तिसऱ्या तिमाहीत 10 हजार 015 नवीन सदनिका निर्माण (Pune Real Estate) करण्यात आल्या. गतवर्षी याच काळात 4 हजार 635 नवीन घरे उभारण्यात आली होती. त्यामुळे तलुनेत यावर्षी नवीन सदनिकांचा पुरवठा 116 टक्क्यांनी वाढला आहे.

दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2021 या कालावधीत दोन हजार 810 सदनिकांचा पुरवठा झाला होता. महत्वाचे म्हणजे घरी खरेदी वाढण्याचे कारणही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. घरी खरेदी वाढवण्याचे दोन मुख्य कारण म्हणजे पहिले सर्वात कमी व्याजदर (Interest rate) आणि मुद्रांक शुल्कात महिलांना सवलती (Concessions to women in stamp duty) सारख्या विविध आकर्षक योजना.

प्रॉप टायगर व्यवसाय प्रमुख राजन सूद (Rajan Sood) म्हणाले की, बँकांच्या व्याजदरांमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वांत कमी व्याजदर आकारला जात आहे. तसेच व्यावसायिकांकडूनही घरांची विक्री वाढवण्यासाठी विविध सवलती देण्यात येत आहे. तसेच काही राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्क कमी केला होता. त्यामुळे घर विक्री मध्ये वाढ झाली. येत्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमधील बांधकाम क्षेत्रात आणखी स्थिरता दिसेल.

 

पुण्यातील सदनिकांचा पुरवठा व विक्री

सन पुरवठा विक्री

2018 59,175 65,384

2019 58,382 70,092

2020 25,343 39,086

2021 (सप्टेंबरपर्यंत) 22,573 26,348

प्रमुख आठ शहरातील न विक्री झालेल्या सदनिकांची संख्या

शहर सदनिकांची संख्या महिने (इन्व्हेंटरी ओव्हर हँग)

पुणे 1,28,093 41

मुंबई 2,61,385 58

अहमदाबाद 51,208 42

बंगळुरु 67,644 35

चेन्नई 35,145 32

दिल्ली 1,00, 559 62

हैदराबाद 50,103 25

कोलकता 26,385 32

 

Web Title :- Pune Real Estate | Good day to the construction sector in Pune; 43 percent increase in sales

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Patil | ‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, हर्षवर्धन पाटलांनंतर ‘या’ पाटलांचे वक्तव्य

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा (व्हिडिओ)

Pune Crime | सावत्र मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खून, फरार आरोपी बापाला 3 तासात ठोकल्या बेड्या