पुण्यात सरासरीहून सर्वात जास्त २० टक्के पावसाची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सध्या महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तीन टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात आतापर्यंत पुण्यात सरासरीहून सर्वात जास्त २० टक्के पाऊस नोंदला गेला आहे. ठाण्यात १६ टक्के तर, पालघरमध्ये १२ टक्के पाऊस अधिक झाला. मुंबई शहरात मात्र सरासरीपेक्षा ३ टक्के कमी तर उपनगरात १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. राज्याचा विचार करता सप्टेंबरच्या प्रारंभी मान्सूनने जेमतेम सरासरी गाठली आहे. नंदूरबार, सांगली, सोलापूरमध्ये मात्र सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र मराठवाडा, पूर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाने ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात हजेरी लावून दिलासा दिला आहे.

[amazon_link asins=’B01N4KXKIS,B0085S0612′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55fb731b-ae7c-11e8-bcd6-2f9af764c0d1′]

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात २२ ऑगस्टपर्यंतच्या एका आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. सांगलीत मात्र २२ ऑगस्टपर्यंत समाधानकारक पाऊस पडला नाही. सांगलीत जेमतेम २ टक्के पाऊस अधिक झाला आहे. ऑगस्ट अखेरपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार नंदूरबारमध्ये २४ टक्के, सांगलीमध्ये २५ टक्के पाऊस कमी पडला आहे. सोलापूरमध्ये २३ टक्के पाऊस कमी आहे. कोकण वगळता ऑगस्टच्या २२ तारखेपर्यंतच्या आठवड्यात इतर विभागांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.

कोकणात जून, जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाला. सध्या समोर असलेल्या परिस्थितीनुसार १० सप्टेंबरनंतर ३० सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील आणि ही सरासरी कायम राखली जाईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये या काळात पाऊस फारसा होण्याची चिन्हे नाहीत, मात्र विदर्भ आणि कोकणात १० सप्टेंबरनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी मदत करा : संभाजी भिडे

जाहिरात