पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; दिल्‍लीच्या एम्स हॉस्पिटलमधील सेवानिवृत्‍त डॉक्टरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असुन याप्रकरणी दिल्‍ली येथील एम्स हॉस्पीटलमधील सेवानिवृत्‍त डॉक्टरला अटक करण्यात आली. न्यायालयाने अटकेतील डॉक्टरला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश शुक्रवारी दिला आहे. सेक्स रॅकेट प्रकरणी सेवानिवृत्‍त डॉक्टरला अटक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. सुरेश कुमार सूद (74, रा. 108, किंग्ज अपार्टमेंट, मिरा रोड, ठत्तणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सुद हा दिल्‍ली येथील एम्स हॉस्पीटलमधून सेवानिवृत्‍त झाला आहे. तो मुंबईतील 24 त 25 वर्षीय हिंदी आणि मल्याळी अभिनेत्रींचा वापर करून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमधील रूम नंबर 801 आणि 804 मध्ये छापा टाकला. तेथे दोन अभिनेत्री आढळून आल्या. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

दरम्यान, डॉ. सूद हा हॉटेलच्या वेटींग रूममध्ये बसला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी डॉ. सुदला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. डॉ. सुद हा पुण्यात कोणाच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवित होता आणि इतर बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्‍त अशोक मोराळे, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे आणि सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.