Pune : निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे शहर पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

संतोष जगन्नाथ गायकवाड (वय ५८) असे मृत्यू झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. संतोष गायकवाड हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. 31 ऑगस्टला पोलीस दलातून सेवा निवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्तीच्या दिवशीच त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोनाची चाचणी टेस्ट घेतली होती.

त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना काळात पुणे शहर पोलीस दलातील हा सातवा बळी आहे. संतोष गायकवाड यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. यघटनेमुळे शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like