पुण्याचा महसूल विभाग अँन्टी करप्शनच्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आठवड्या भरातच दोन कोट्याधीश भ्रष्टाचारी सापडल्यामुळे एसीबीकडून महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महसूल विभागातील सगळे एसीबीच्या रडारवर आले आहेत. शनिवारच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. लाचखोरी पोलीस विभागात जास्त असते असा गैरसमज नागरिकांचा आहे. मात्र तसे नसून लाचखोरीत पोलीस नव्हे तर महसूल विभाग सध्या टॉपवर आहे.

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत दोन मोठे मासे गळाला लागले आहे. जमीनीवरील नावे कमी करुन देण्यासाठी एका वकिलाने १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. तर शनिवारी वारस नोंदणी कण्यासाठी मुळशीच्या तहसिलदाराला १ कोटीची लाच घेताना अटक करण्यात आली. तहिसलदारावर कारवाई करुन अँन्टी करप्शनच्या पथकाने कारवाईचे आपले द्वीशतक साजरे करुन लाचखोरांवर कारवाई करण्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावीला.

पुण्याचे विस्तारीकरण होत असताना पुणे शहाराच्या परिसरातील जमीनींना कोट्यावधीचा भाव मिळत आहे. याच जमीन खरेदी विक्रीतून सरकारला कोट्यावधीचा महसूल मिळतो. हाच महसूल विभाग सध्या भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. पुणे महसूल विभागात दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल तर होतेच त्याच तुलनेत लाचखोरी देखील होत आहे. या आठवड्यात एसीबीने दोन कोट्याधिशांना लाच घेताना अटक केली. या दोन प्रकरणामध्ये तक्रारदारांनी धाडस दाखवून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे ही दोन मोठी प्रकरणे उजेडात आली. अशी अनेक प्रकरणे आहेत ती उजेडात येतच नाहीत.

या विभागातील लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे सरकारचा लाखोचा महसूल बुडवला जातो. जमीनीची खोटी माहिती देऊन सरकारची फसवणूक तर केली जातेच परंतु त्याबदल्यात लाखो रुपयांची लाच घेतली जाते.अशा लाचखोर अधिकाऱी आणी कर्मचाऱ्यांवर वचक बसावा यासाठी एसीबीने महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. एसीबीच्या या भुमीकेमुळे भ्रष्ट अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जानेवारी ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात ८८२ ‘ट्रॅप’ करण्यात आले. यापैकी २०० ट्रॅप फक्त पुणे विभागात करण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये महसूल विभाग टॉपवर आहे. महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २१४ प्रकरणे उघडकीस आली असून, २६९ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारतर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचे फायदे सर्वसामान्यांना देण्यासाठी लोकसेवकांकडून लाचखोरीचा मार्ग अवलंबिला जातो. अँन्टी करप्शनच्या पथकाने महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर केलेल्या कारवाईत तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. तृतीय श्रेणीतील १८५ कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.तर ४ क्लास वन अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारी ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये अँटी करप्शनच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २ कोटी ६ लाख १४ हजार १०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत आता शेतकरी भ्रष्टाचाराला बळी पडत आहे तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पोलीस विभागावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जवाबदारी असताना रक्षकच भक्षक बनल्यावर सामान्य नागरिकांनी सुरक्षेची अपेक्षा करायची तरी कुणाकडून. राज्याच्या सुयोग्य कामकाजात महसूल आणि पोलीस विभागाचा महत्त्वाचा वाटा असतो, पण हे दोन्ही विभाग भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेत आणि यात बदल घडवणे, ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

२०१८ या वर्षातील १ जानेवारी ते २८ डिसेंबरपर्यंत एसीबीचे विभागनिहाय सापळे
विभाग                               सापळे
१) महसूल                             २१४
२) पोलीस                             १९५
३) पंचायत समिती                   ९०
४) म. र. वि. वि. क. मर्या          ४९
५) महानगरपालिका               ४७