Pune : कडक निर्बंधाबाबत पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सुधारित आदेश; जाणून घ्या शहरात काय चालु अन् काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (मंगळवार) रात्री जनतेला संबांधित करताना आज (बुधवार) रात्रीपासून संपुर्ण राज्यात कलम 144 (संचारबंदी) लागू करणार असल्याची घोषणा केली. त्याच पार्श्वभुमीवर पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी सुधारित आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात काय चालु आणि काय बंद हे आपण जाणून घेऊ.

1. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कलम 144 बाबत –

अ. पुणे मनपा क्षेत्रात दि. 14 एप्रिलच्या सायंकाळी 6 ते दि. 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.

ब. नागरिकांना या आदेशात नमूद केल्याप्रमाणे अत्यावश्यक कामाशिवाय / अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

क. या आदेशान्वये परवानगी देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, सर्व प्रकारचे उपक्रम, सेवा बंद ठेवण्यात येत आहे.

ड. या आदेशामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम आणि सेवा या सुरू राहतील.

इ. या आदेशातील मुद्दा क्र. 5 अन्वये सुट देण्यात आलेल्या सेवा, उपक्रम हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळत सुरू राहतील.

फ. पुणे मनपा क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वंयपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणार्‍या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स यांना आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी राहील.

2. अत्यावश्यक सेवा यामध्ये खालील सेवांचा समावेश असणार आहे.

* रूग्णालये, डायग्रोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्यक करणारे उत्पादन व वितरन युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणार्‍या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा.

* पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने (पेट शॉप्स)

* किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने

* शीतगृह आणि गोदाम सेवा

* सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा

* वेगवेगळया देशांचे राजदूत यांची कार्यालये

* पूर्व पावसाळी नियोजित कामे

* स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविण्यात येणार्‍या सार्वजनिक सेवा

* रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा

* सेबी तसेच सेबीची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये

* दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा

* मालवाहतूक

* पाणी पुरवठा सेवा

* कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी)

* सर्व प्रकारचे आयात-निर्यात

* ई-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठयासाठी)

* मान्यता प्राप्त मिडिया

* पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणार्‍या सेवा

* सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा

* डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित पायाभुत सुविधा आणि सेवा

* शासकीय व खासगी सुरक्षा सेवा

* विद्युत व गॅस वितरण सेवा

* एटीएम सेंटर

* पोस्टल सेवा

* बंदरे व त्यासंबंधित उपक्रम

* कस्टम हाऊस एजंट्स, लस / औषधे / जीवन रक्षक औषधांशी संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

* कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणारे / पुरवठा करणारे सवा

* पावसाळयाच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणार्‍या सेवा

* आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

* मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने

सार्वजनिक वाहतूक – रिक्षा, टॅक्सी / कॅब / चारचाकी स्वयंचलित वाहन खाली मार्गदर्शक सूचना / अटीनुसार सुरू राहतील

1. रिक्षा – वाहन चालक आणि 2 व्यक्ती

2. टॅक्सी / कॅब / चारचाकी स्वयंचलित वाहन – वाहन चालक आणि आरटीओ व्दारे निर्गमित केलेल्या आसन क्षमतेच्या 50 टक्के आसन क्षमता

3. बस – आरटीओ व्दारे निर्गमित केलेल्या आसन क्षमतेनुसार प्रवासी संख्या

रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार –
*
पुणे मनपा क्षेत्रातील रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट (हॉटेलमधील / हॉटेल प्रिमायसेसमधील वगळून) हे बंद राहतील.

* रेस्टॉरंट, हॉटेल्स, बारव्दारे पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील. हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही.

धार्मिक स्थळे –
*
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील.

* सदर ठिकाणी फक्त दैनंदिन पूजा / अर्चना करणारे कर्मचारी यांना परवानगी राहील.

* सदर ठिकाणचे कर्मचारी यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय –
*
पुणे मनपा क्षेत्रातील सर्व स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय संपूर्णतः बंद राहतील.

* सदर ठिकाणचे कर्मचारी यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

पुणे मनपा क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

* इयत्ता 10 वी आणि 12 वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे.

सामाजिक राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा व तत्सम मोठया संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

महत्वाचे – भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेणे हे सर्व परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनांना बंधनकारक असणार आहे.

मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांचे सुधारित आदेश पाहण्यासाठी ट्विट पाहावे.