Pune Rickshaw Strike | रिक्षाचालकांच्या अडचणीत वाढ? रॅपिडोला अ‍ॅग्रिगेटर परवाना देण्यावर पुनर्विचार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे आरटीओला आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात रिक्षाचालक विरुद्ध दुचाकी, टॅक्सीचा (Pune Rickshaw Strike) वाद मिटायची चिन्हे दिसत नाहीत. शहरात सुरू झालेल्या बेकायदा बाइक, टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालकांनी 28 नोव्हेंबर रोजी संप (Pune Rickshaw Strike) पुकारला होता. या संपात रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. रिक्षाचालकांशी चर्चेदरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी बेकायदा दुचाकी, टॅक्सी विरोधात कारवाई केली जाईल, त्यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमले जातील, कारवाईसाठी आवश्यक असणारे सहकार्य पोलिसांनाही केले जाईल, असे सांगितले होते.

 

पण, रॅपिडो कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रॅपिडो कंपनीला त्यांचा अॅग्रिगेटर परवाना देण्याच्या विषयावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 29 मार्चला रॅपिडोने पुणे आरटीओमध्ये अॅग्रिगेटर परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे आरटीओने तशी परवानगी देण्यास नकार दिला. अर्जात काही त्रुटी असल्याचे कारण देत आरटीओने तो अर्ज नाकारला. पण रॅपिडो कंपनीने पुन्हा नवीन अर्ज केला. पण तसा कोणताही अर्ज मिळाला नसल्याचे आरटीओने सांगितले. या विषयांची कोर्टात सुनावणी होत असताना पुण्यात रिक्षाचालकांनी बंद पुकारून दुचाकी, टॅक्सी बेकायदेशीर ठरवण्याची मागणी केली. त्यामुळे पुणे आरटीओने अशा सेवा बेकायदेशीर ठरवल्या आणि अशा सेवांवर बंदी घातली.

त्यानंतर 29 नोव्हेंबरला रॅपिडोने पुन्हा याचिका करत या प्रकरणात उच्च न्यायालयाला लक्ष घालण्याची विनवणी केली.
त्यानंतर उच्च न्यायालयाने पुणे आरटीओचे आदेश बाजूला ठेऊन रॅपिडोच्या अॅग्रिगेटर परवान्यावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे पुणे आरटीओ आता काय निर्णय घेते आणि रिक्षाचालकांच्या संघटना त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Pune Rickshaw Strike | Increase in the difficulty of rickshaw drivers? Bombay High Court orders Pune RTO to reconsider grant of aggregator license to Rapido

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय