Pune Rickshaw Strike | बाईक टॅक्सी सेवेविरोधात पुण्यात रिक्षाचालक करणार बेमुदत बंद; ‘बघतोय रिक्षावाला संघटने’च्या आवाहनाला इतर रिक्षा संघटनांचा पाठिंबा

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन – पुण्यात चालू असलेल्या बाईक टॅक्सी (Bike Taxi) बंद करा. या मागणीसाठी पुण्यात रिक्षा संघटना 28 नोव्हेंबर रोजी बंद पुकारणार आहेत. ‘बघतोय रिक्षावाला संघटनेने’ (Baghtoy Rikshawala) हा बंद पुकारला असून या बंदाला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन 28 नोव्हेंबरला सकाळी 10 पासून सुरु होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बघतोय रिक्षावाला संघटने’चे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर (Dr Keshav Kshirsagar) यांनी केली आहे.

तर, या बंदाला पाठिंबा जाहीर करत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे (Maharashtra Rickshaw Panchayat Chief Baba Kamble) म्हणाले, ‘रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून, रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी केले. रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट व गंभीर होत आहे त्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. अन्यथा, शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील आत्महत्या करावी लागेल. यापूर्वी देखील आठ रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्या आहेत.
कोविडनंतर अनेक रिक्षालकांच्या रिक्षा ओढून नेल्या त्यांचे संसार उघड्यावरती आले.
आता ते हळूहळू आपला व्यवसाय करत आहेत, पण एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

बघतोय रिक्षावाला संघटना खूप दिवसांपासून ओला (Ola), उबेर (Uber), रॅपिडो (Rapido) अशा कंपन्यांच्या
बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन करत आहे. पण सरकारने त्यांना आश्वासनापलीकडे काहीच दिलेले नाही.
या पुण्यात गेले काही दिवस बाईक टॅक्सीवर बंदी घातली आहे.
पण ही बंदी कायमस्वरूपी करावी अशी मागणी संघटना करत आहेत.
बाईक टॅक्सी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्तेतील सर्वात धोकादायक प्रवास पद्धती असून, रिक्षा चालकांप्रमाणे,
त्यांना कायद्याचे बंधन नाही आणि वाहतूक विभागाकडे रिक्षाप्रमाणे त्यांना कर भरावा लागत नाही.

Web Title :- Pune Rickshaw Strike | Pune rickshaw pullers to go on indefinite strike against bike taxi service; The call of ‘Baghtoy Rickshawala Association’ is supported by other rickshaw associations

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ