Pune Ring Road Land Acquisition | रिंग रोड प्रकल्पग्रस्तांची भूसंपादन प्रक्रिया जूनअखेरीस सुरु; मिळणार फेरमूल्यांकनानुसार मोबदला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाचे (Pune Ring Road Land Acquisition) काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांना यासंदर्भात येत्या जून महिन्याच्या अखेरपासून नोटीस दिल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) रिंगरोडसाठी प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला दिला जाणार आहे. नोटीस दिल्यानंतर भूसंपादनाचे काम सुरु करण्यात येणार आहे. (Pune Ring Road Land Acquisition)

प्रकल्पासाठी जमिनीची मूल्यांकन प्रक्रिया (Evaluation Process) राबविण्यात आली होती व त्यामध्ये मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार गृहीत धरून मूल्यांकन करण्यात आले.
मात्र कोरोना काळातील बंदीमुळे रिंगरोड प्रकल्पग्रस्त बहुतांशी गावांत खरेदी- विक्रीचे व्यवहार कमी झाले.
त्यामुळे स्थानिकांनी प्रकल्पासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचा दर कमी होत असल्याचा आक्षेप घेतला.
त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून
त्यानुसार पश्चिम भागातील बहुतांशी सर्व गावांचे फेरमूल्यांकन (Revaluation) पूर्ण करण्यात आले. मात्र पूर्व भागातील काही गावांचे फेरमूल्यांकन अद्याप झालेले नाही.

भूसंपादन समन्वय अधिकारी प्रवीण साळुंखे (Pravin Salunkhe) यांनी या भूसंपादन प्रक्रियेविषयी अधिकची
माहिती देताना सांगितले की, नवीन करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना (Project Victims)
मोबदला दिला जाणार असून त्याचे नवीन तक्ते अद्ययावत (Updated) करावे लागणार आहेत.
त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन जूनअखेरपासून प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे,
त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबत माहिती देणारी नोटीस पाठविण्यात येईल.
त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीत मान्यता असल्यास त्या व्यक्तींकडून लिखित स्वरूपात घेऊन
तातडीने भूसंपादन प्रक्रिया (Pune Ring Road Land Acquisition) राबविण्यात येईल.
स्वत:हून जमीन देण्यास तयार झालेल्यांना जास्त मोबदला दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title :  Pune Ring Road Land Acquisition | Land acquisition process of ring road project victims to start by end of June; Remuneration will be given as per revaluation

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | ‘बाहेरून कीर्तन आतून तमाशा’, केजरीवाल यांच्या भेटीवर विखे पाटलांची विरोधकांवर टीका

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परस्पर हडप केली 50 लाखांहून अधिक रक्कम; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील गडबड घोटाळा, 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Triple Talaq Case | पुणे ट्रिपल तलाक केस : विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला अटक ! सासु, सासरे, नणंद व नंदावाची अटकपुर्वसाठी न्यायालयात धाव