Pune Ring Road Project – Land Acquisition | पुणे : रिंगरोडसाठी सर्वाधिक 1601 हेक्टर खासगी जागेचे भूसंपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ring Road Project – Land Acquisition | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) नियोजित रिंगरोडसाठी एकूण १७४० हेक्टर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक १६०१ हे. क्षेत्र खासगी जागा मालकांचे आहे. (Pune Ring Road Project – Land Acquisition)

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri-Chinchwad) वाहतूक कोंडीवर (Traffic Jam) उपाय म्हणून एमएसआरडीसीने १७२ कि.मी. लांब आणि ११० मी. रुंद रिंगरोड प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात विभागण्यात आला आहे. पूर्व भागात मावळ तालुक्यातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. (Pune Ring Road Project – Land Acquisition)

 

दरम्यान, मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यांतून पूर्व आणि पश्चिम वर्तुळाकार रस्ता जात आहे. या प्रकल्पात ८३ गावे बाधित होणार आहेत. त्यातील ७७ गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील २५० कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी प्राप्तही झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यात चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) दर, गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहार, या भागातील अन्य प्रकल्पाला दिलेला दर यापैकी जो अधिक असेल तो दर दिला जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे होणार भूसंपादन
मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एकूण ५६४ हे. क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
त्यात खासगी ५२०.३२ हे., गायरान जमीन ०.२२ आर, वन विभागाची २३.५२ हे.,
तर इतर विभागांची २०.४० हे. क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
हवेली उपविभागीय अधिकारी खासगी ४८५.८९ हे., गायरान ८.२७ हे.,
वन जमीन ६२.८० हे. आणि इतर विभागांची ६.८५ हे. क्षेत्र संपादित होणार आहेत.
भोर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी १५९.२२ हे., वन जमीन २.३३ हे.
संपादित होणार आहे. पुरंदर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत १४६.९० हे.
क्षेत्र खासगी आणि वन विभागाची ३.५६ हे. संपादित होणार आहे.
खेड (राजगुरुनगर) उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी २८८.९५ हे.,
गायरान जमीन ३.८ हे. आणि इतर विभागाची साडेआठ हे. क्षेत्र संपादित होणार आहे.

 

Web Title :- Pune Ring Road Project – Land Acquisition | Pune: Land acquisition of 1601 hectares of private land for ring road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Asthma | दमा असलेल्या रुग्णांसाठी ‘नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद’ गुणकारी औषध, 100% फरक

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…