Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 14 गावांतील भूसंपादन पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Ring Road | पुणे (Pune Traffic Jam) आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी (Pimpri Chinchwad Traffic Jam) सोडविण्यासाठी भूसंपादन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने Maharashtra State Road Development Corporation (एमएसआरडीसी – PSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडसाठी (Pune Ring Road) पूर्व आणि पश्चिम भागातील १४ गावांतील सुमारे २०० एकरहून जास्त भूसंपादन (Land Acquisition) पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यात संपादित करावयाच्या एकूण क्षेत्रापैकी १० टक्क्यांहून जास्त क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण केले आहे.

प्रशासनाने चौदा गावातील दोनशे पेक्षा जास्त एकराचे भूसंपादन पूर्ण केले आहे. पूर्व भागातील रिंगरोडसाठी ४ गावातील तर पश्चिम भागातील रिंगरोडसाठी १० गावातील क्षेत्राचे भूसंपादन केले आहे. १४ गावातील २३२ गटातील ९३४ खातेदारांना आतापर्यंत जागेच्या मोबदल्यापोटी २७६ कोटी रुपये वाटप केले आहेत. हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी ही माहिती दिली.

रस्ते महामंडळ १७२ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा रिंगरोड (Pune Ring Road) बांधणार आहे. या कामाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्पे असतील. पूर्व भागातील मावळमधील ११, खेडमधील १२, हवेलीमधील १५, पुरंदरमधील ५ आणि भोरमधील ३ गावातून रिंगरोड जाणार आहे.

तर पश्चिम भागातील भोरमधील ५, हवेलीमधील ११, मुळशीमधील १५ आणि मावळमधील ६ गावांतून हा रिंगरोड जाईल.
यासाठी ४४ गावातील सुमारे साडेसातशे हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे.

जिल्हा प्रशासनाने पाच जुलैपासून पश्चिम मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती.
यामध्ये बाधितांना नोटिसा देऊन ३० जुलैपर्यंत संमतिपत्रे सादर करण्यास सांगितले होते.
काही कारणामुळे ही मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढवली होती. या काळात १४ गावातील सुमारे २०० एकर क्षेत्राचे
भूसंपादन करण्यात प्रशासना यश आले आहे.

पूर्व भागातील कोरेगाव मूळ, गावडेवाडी, बिवरी, वाडेबोल्हाई या गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे.
तर पश्‍चिम भागातील कल्याण, खामगाव मावळ, भगतवाडी, रहाटवडे, वडदरे, सांगरूण, बहुली, मोरदरवाडी, थोपटेवाडी,
मांडवी बुद्रुक या गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार