Pune Ring Road | पुणे रिंग रोडचे काम मुदतीत पूर्ण होणार, शंभूराज देसाईंची माहिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे (Pune Ring Road) काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे (Land Acquisition) काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे (Pune Ring Road) काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत सांगितले

संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड
पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.पश्चिम भागातील रिंग रोड प्रक्रिया फेब्रुवारी 2023 मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू केला जाईल. यासाठी मोबदला दुप्पट केला आहे. या रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत ॲड. राहुल कुल (Adv. Rahul Kul) यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित
केली होती. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

Web Title :- Pune Ring Road | The work of Pune Ring Road will be completed on time, information of Shambhuraj Desai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | जगात कोरोनाचा वाढता कहर, भारतात पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….