कॉर्नरला युटर्न घेतना भरधाव वाहनाने दाम्पत्याला उडविले, पतीचा मृत्यू, पत्नी व मुलगा जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोहगाव परिसराती फॉरेस्ट कॉर्नरवर युटर्न घेत असताना एका दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात कारने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला. तर, पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाली आहे. वासुदेव मदनलाल व्यास (वय 45, रा. वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, त्यांची पत्नी ज्योती व्यास या जखमी झाल्या आहेत. याबाबत गणेश व्यास (19) याने विमानतळ पोलीस टाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यास कुटूंबिय वडगांव शेरी परिसरात राहण्यास आहेत. ते स्वयंपक करण्याचे काम घेत असत. दरम्यान, चार दिवसांपुर्वी (दि. 14) त्यांना लोहगाव परिसरात एका साखरपुड्याचे स्वयंपकाचे काम घेतले होते. त्याासाठी वासुदेव व्यास, त्यांची पत्नी, मुलगा गणेश असे दुचाकीने घरी परत निघाले होते.

रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ते फॉरेस्ट पार्क समोरील म्हशीच्या गोठ्या समोरील कॉर्नरला युटर्न घेत असताना नगरच्या रोडच्या बाजूने भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकी जोरात धडक दिली. यात तिघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कार चालक तेथे न थांबता तेथून पसार झाला. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपचार सुरू असताना वासुदेव व्यास यांचा मृत्यू झाला. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.