पुणे : स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. साेमवारी (दि.१०) पहाटे साडेतीनच्या सुमारास पद्मा सहकारी सोसायटीजवळ बिबवेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली तर त्यांच्या एका अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B071D4MP9T,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae3aced4-b4e5-11e8-ba0e-7b274ecc95ad’]

रोहित चंद्रकांत जानराव (वय-१९), अविनाश अर्जुन जोगन (वय-२२ दोघे रा. शेळके वस्ती गिरणी शेजारी, अप्पर बिबवेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे इतर साथिदार पोलिसांना पहाताच घटनास्थळावरुन फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3ad4e75-b4e5-11e8-9bc2-05e7a4d1ebcc’]

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत होते. गस्त घालत असताना पद्मा सोसायटी जवळील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरजवळ पाचजण संशयीत रित्या उभारल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करुन तीघांना ताब्यात घेतले. तर त्यांचे इतर साथिदार पोलिसांना पाहताच पळून गेले.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत ते स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकणार होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव फसला. आरोपींकडून कोयता, जांबीया तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.आर. आडके करीत आहेत.

Please Subscribe Us On You Tube