पुणे : भरदुपारी चाकुच्या धाकाने दुचाकीवरून आलेल्यांनी 43 लाख लुटले, पोलिसांनी नाकाबंदी करून 5 जणांना पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर येथे एटीएमध्ये भरणा करण्यासाठी कारमधून 43 लाखांची रोकड घेऊन जाताना दोन दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मात्र, नाकाबंदी दरम्यान पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून 5 जणांना पकडले आहे. तसेच त्यांच्याकडून पूर्ण रोकडही जप्त केली आहे.

याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूणे ग्रामीण जिल्हयातील वडगांव निंबाळकर हददीमध्ये आळेफाटा येथे आल्टो गाडीमधून आयसीआयसीआय बॅकेचे 43 लाख रूपये घेवून एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून पल्सरवर आलेल्या 4 अनोळखी चोरट्यानी या कारच्या समोर दुचाकी उभ्या केल्या. तसेच चाकूचा धाक दाखवून 43 लाखांची रोकड चोरून नेली. त्यांनी तत्काळ पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‍नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यांनी ही माहिती आळेफाटा पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी व त्यांच्या पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात नाकाबंदी केली. त्यावेळी दोघे बारामती रोडवर दोघांना नाकाबंदी दरम्यान पकडले गेले. तर सुपागाव येथील कोंढवेवाडीत दोघांना आणि इतर ठिकाणी एकाला पकण्यात आले आहे. सुदैवाने या आरोपींकडून जागीच पूर्ण रोकड सापडली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. या दोघांकडे चौकशी करण्यात येत आहे. त्यांची नावे अजून पूर्ण मिळली नसून त्यांच्याकडे तपास करण्यात येत असल्याचे सहाय्यक निरीक्षक लांडे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com